म्हसवड- सन्मानाला सर्वजण पात्र असतात, पण आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही म्हणून आपण मागे राहतो.प्रत्येकामध्ये काही सुप्त गुण त्याला थोडी चालना मिळाली की ते सुर्यप्रमाणे चमकू लागतात. त्यातून ते आपला व आपल्या देशाचा विकास करू शकतात असे प्रतिपादन अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, चेअरमन व स्कुल कमिटी सदस्य नितिन दोशी यांनी केले.
येथील सिद्धनाथ हायस्कुल व ज्युनि.कॉलेजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अपूर्व विज्ञान मेळाव्यात ज्या अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेऊन नवनवीन वैज्ञानिक उपकरणे बनवून प्रदर्शनात ठेवली होती. त्यातील  उत्कृष्ठ उपकरणांना  अहिंसा पतसंस्था म्हसवड तर्फे प्रमाणपत्र व बक्षिस ठेवण्यात आले होते.त्या बक्षिसाचे वितरण आज चेअरमन नितिन दोशी यांचे हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते.

     यावेळी बोलताना आरपीआयचे किशोर सोनवणे म्हणाले की,बक्षिस हे प्रोत्साहन देण्याचे माध्यम आहे. दुसऱ्याला मिळालेले बक्षिस पाहून आपल्या मनात जिद्द निर्माण व्हावी याच उद्देशाने बक्षिस समारंभाची  आवश्यकता आहे , हे ओळखून अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन, दोशी हे या नगरीतील सर्वच गुणी लोकांचे सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देत असतात. हे त्यांचे कार्य खरेच प्रशंसनीय आहे.

    

आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य काकडे म्हणाले की,अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी नितिन दोशी यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध उपकरणे पाहिल्यानंतर त्यांचे परीक्षण केले.अशा मुलांचे कौतुक हे अधिक लाभदायक होते हे जाणून यातील गुणी विद्यार्थ्यांना अहिंसा पतसंस्थेच्या वतीने बक्षिसे देण्याचे ठरवले व तो कार्यक्रम आज येथे पार पडत आहे.यातुन प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी पुढील वर्षी यात सहभागी होतील यात अजिबात शंका नसल्याचे सांगितले.नितिन दोशी करत आलेल्या कार्याचा गौरव ही केला.

 यावेळी नितिन दोशी व त्यांच्या पतसंस्थेच्या संचालकांनी गुणी विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदशन करणाऱ्या शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला.

  यावेळी सिद्धनाथ हायस्कुलचे प्राचार्य अरुण काकडे, अहिंसा पतसंस्थेचे संचालक प्रितम शहा, बाळासाहेब सरतापे, व्यवस्थापक महेश पतंगे,नितिन वाडेकर,नाना मासाळ, अशोक काळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे,उपप्राचार्य अशोक शिंदे आदी उपस्थित होते.

 
Top