मनी लाँडरिंग प्रकरणात वधेरा यांना १६ फेब्रुवारी पर्यंत अटकपूर्व जामीन मिळाला आहे. न्यायालयाने सहा फेब्रुवारी रोजी वधेरा यांच्या चौकशीसाठी परवानगी दिली होती. त्यानुसार ते ‘ईडी’च्या कार्यालयात प्रियंका यांच्या सोबत आले.त्यांच्यावर याआधी झालेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. 
वधेरा यांचे निकटवर्तीय सुनील अरोडा यांच्याविरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी ‘ईडी’कडून गुन्हा दाखल केला आहे. अरोडा यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. हे प्रकरण लंडनस्थित १७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेचे आहे. ‘ईडी’ने केलेल्या दाव्यानुसार ती मालमत्ता वधेरा यांची आहे.
 
Top