पंढरपूर येथे दि.१६ फेब्रुवारी २०१९ रोजी माघी  यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली असुन  यात्रेकरुंना यात्रा कालावधीमध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली.

नगरपरिषदेने प्रदक्षिणा रस्त्याचे व शहरातील रस्ता दुरुस्तीची कामे यात्रेपुर्वी करण्यात आली आहे. तसेच स्टेशन रोड, अर्बन बँक ते नाथ चौक, सावरकर पुतळा ते महाद्वार, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, अंबाबाई पटांगण,चंद्रभागा वाळवंट तसेच संपुर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवरील येथील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असुन अतिक्रमण काढण्यासाठी विशेष पथकाची निर्मीती करण्यात आली आहे. त्या पथकामार्फत अतिक्रमण काढण्याचे काम युद्धपातळीवर काम चालु आहे. पुंडलिक मंदीर ते दगडी पुलापर्यंत ६ हायमास्ट दिवे, प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर असे एकुण ३० मेटल हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत.यात्रेकरुंच्या सोईसाठी संपुर्ण दर्शन बारी मार्ग, ६५ एकर मध्ये २९० व वाखरी तळावर १४८ मेटल हायमास्ट, सोडियम व्हेपर दिवे बसविण्यात आले आहे. अनिल नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन स्वतंत्र पाईप लाईन द्वारे यात्रेकरुंना पिण्याचे पाणी मिळावे या हेतुन नदीच्या वाळवंटामध्ये ४५ नळ बसविण्यात आले आहेत. तसेच वाळवंटात विशेष स्वच्छता रहावी म्हणुन पंढरपूर नगरपरिषद कर्मचा-यांमार्फत दररोज स्वच्छता करण्यात येत आहे.वाळवंटात उघड्यावर शौचास बसु नये म्हणुन विशेष टीम नेमण्यात आली आहे. तसेच  पत्राशेड, ६५ एकर येथे आगीची दुर्घटना होवु नये म्हणुन २४ तास अग्निशमन वाहन उभे करण्यात आले आहेत. शहर व मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. गोपाळपुर नाका येथील पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शन द्वारे उपलब्ध करुन दिले आहे. शहरात एकुण ६५ हातपंप व १३० विद्युत पंप उपलब्ध असुन याद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.यात्रा कालावधीमध्ये स्वच्छता रहावी म्हणुन नगरपरिषदेच्यावतीने ११०० सफाई कर्मचा-यांद्वारे शहरात व उपनगरात स्वच्छता करण्यात येत आहे.५५ घंटागाडी द्वारे दिवसा व रात्री २४ तास कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत चालु  राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील वाहनामार्फत दररोज ६० ते ८० टन कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मठामधील कचरा रात्री संकलित करण्यात येणारा आहे   

     जैविक पद्धतीने तयार होणारे बायोकल्चर नदीच्या पात्रात फवारणी करुन दुर्गंधीयुक्त वास कचरा व घाण कुजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.४ ठिकाणी यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात आले आहे. यात्रा कालावधीत कॉलरा हॉस्पिटल येथे हंगामी स्वरुपाचे संसर्गजन्य रुग्णालय स्थापित करण्यात आले आहे.यात्रा कालाधीमध्ये संपुर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष पंढरपूर नगरपरिषद मुख्य कार्यालय येथे उघडण्यात आले आहे.त्याचा दुरध्वनी क्र.२२३२५३ असा आहे. नगर परिषद टोल फ्री नंबर १८००२३३१९२३ आहे. 

  यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, पक्षनेते, सर्व सभापती व नगरसेवक, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे अवाहन करण्यात आले आहे.

 
Top