नवी दिल्ली -हैदराबाद येथे श्रीनगर कॉलनीतील एका इमारतीत २१ वर्षीय तेलुगू टेलिव्हिजन अभिनेत्री नागा झांसी हिने बुधवारी आपल्या राहत्या घरीपंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केेली आहे. आत्महत्येवळी अभिनेत्री घरात एकटीच होती. नागा झांसीचा भाऊ दुर्गा प्रसाद घरी पोहचल्यावर कोणीही दरवाजा न उघडल्याने याबाबत शेजाऱ्यांना विचारण्यात आले. परंतु त्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा उघडताच अभिनेत्री नागा झांसीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत समोर आला.

झांसीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे एका  तरूणाशी प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून ती तणावाखाली होती. प्रेमप्रकरणातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. झांसीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून पुंजागुट्टा पोलीस कॉल डेटा आणि चॅट रेकॉर्ड्सची तपासणी करत आहेत. 

आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात राहणाऱ्या झांसीने 'पवित्र बंधन' यासारख्या मालिकांसह अनेक मालिकांमधून काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती अमीरपेट भागात ब्यूटी पार्लर चालवत होती.

 
Top