महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ४४ व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याचे उदघाटन आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, महाव्यवस्थापक कुसुम बालश्रॉफ, राजेश कुंटे उपस्थित होते.

उदघाटन प्रसंगी बोलताना आ.डॉ.गोऱ्हे म्हणाला की, महिलांच्या कोणत्याही संस्था ह्या अडखळीच्या असतात. माविमला १९९८ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे अध्यक्षपदाला राज्यमंत्री दर्जा मिळाला. यानंतर लगेच महिला आयोगाला राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला असल्याची आठवण आ.डॉ.गोऱ्हे यांनी करून दिली. महिला बचतगटांना बँक कर्ज देण्यासाठी पुढे येत आहेत कारण मोठे उद्योगपती कर्ज फेडत नाहीत पण माझ्या महिला भगिनी सर्व कर्जाचा परतावा करतात. २००५ ते २०१० दरम्यान बीपीएल बचतगट चे एपील बचतगटात त्याचे रूपांतर झाले आहे. पंरतु एपील बचतगट झाल्यानंतर वेगळी व्यवस्था तयार करून नवीन योजना तयार करण्यासाठी सर्व विभागात विभागीय आयुक्त यांच्या सोबत बैठक घेतल्या होता. याचे आज फलित झाले आल्याने आ.डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले. बँकेत बचतगटांच्या महिलांना व्यवस्थित वागणूक दिली पाहिजे यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांनी निवेदन पाठविणार आल्याचे यावेळी यांनी नमूद केले.

 आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी माविम च्या अध्यक्ष असताना जे सांगाती विशेषांक तयार केले होते त्या विशेष अंकास आज २० वर्ष पूर्ण झाली आहेत. या वर्ष २०१८ ते १९ अंकाचे विमोचन आ.डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. सांगाती हे नाव वार्तापत्राला माविमने आ.नीलम गोर्हे यांच्या कार्यकालात दिले होते.त्याच्या विशेष अंकाचेही प्रकाशन आज नीलम गोर्हे यांच्या हस्ते करण्यात आले.२०वर्षे सांगाती वार्तापत्र चालु ठेवल्याबद्दल माविमचे अभिनंदन केले.

या पुढे बोलतांना आ.डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकारने महिला उद्योग तयार केले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी माविमच्या अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे यांनी घेऊन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी भाषणात अध्यक्षा माविम म्हणाल्या की, माविम ने बचतगटांना स्थैर्य निर्माण करून दिले आहे. परंतु माविमला आर्थिक स्थैर्य नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. माविमला आर्थिक मदतीसाठी आ.डॉ.गोऱ्हे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच सरकार पातळीवर येणाऱ्या अडचणीचे निवेदन आ.डॉ.गोऱ्हे यांनी देण्याची विनंती केली यावर नक्कीच सरकार दरबारी बैठक आयोजित करून प्रश्न महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या सहकार्याने सोडविण्यात येतील असे ही आश्वासन दिले.

यादरम्यान प्रास्ताविक व्यवस्थापकीय सदस्य श्रद्धा जोशी केले. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून महिला बचतगटांच्या प्रतिनिधी उपस्थित होता.त्यांना पुरस्कारही देण्यात आले.

 
Top