गोफणगुंडा:

मढयावरील लोणी खाऊनच !................

जेंव्हा आतंकवादी बेछूट हल्ले करतात

नेमका डाव साधतात

तेंव्हा घरातच फंदफितुरी माजलेली असते 

मात्र सुरक्षा सैनिक हुतात्मा होतात

त्यांचा हिरवा मळा वाळवंट होतो

बोडक्या कपाळाने सार आयुष्य जगावं लागत

जगण्याचा पंचनामा सोसत सोसत 

मरण येईतो जगावं लागत

याच का कुणाला सुतक असतं

कांही दिवस कौतुक नंतर हळू हळू विस्मरण

घरातले विसरतात तर नेते कुठे वेगळे

तेही त्याच वाणाचे कोण मेले कोणासाठी

कोणाचे ओझे कोणाच्या डोक्यावरी

अखेर देवळातील पुजारी देवदूत सांगतो

हे सर्व पूर्वकर्म अखेर तोही जगतो

आमच्याच मढयावरील लोणी खाऊनच !!


वादळी धक्का!

अकलूजला बारामतीने दिला खो

माणला दिला ताण

साहेबांचं राजकारण कोणासही कळत नाही

कितीही जवळीक केली तरी  देखील मनातला 

ठाव लागत नाही!!


वादळी बुक्का !

बारामतीने अकलूजला दिला धक्का

साहेबांचा निर्णय होता पक्का 

माणला थांबा ,माढा दावणीला 

करमाळा चुलीवर , सांगोला फलटण उशाला

माळशिरस लढायला बाकीचे सर्व 

काट्याने काटा कढायला"!!


आनंद कोठडीया , जेऊर ,९४०४६९२२००

 
Top